Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya Sabha Election : राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला मतदान; मविआकडून शरद पवार...

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला मतदान; मविआकडून शरद पवार तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांना संधी?

असं आहे संख्याबळाचं समीकरण

नवी दिल्ली | New Delhi

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.त्यानुसार ५ मार्च पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर ०६ मार्चला अर्जांची छाननी होणार असून, ९ मार्च पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. त्यानंतर १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर होतील.

- Advertisement -

एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्र, ओडिसा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या सहा जागा निवडून येऊ शकतात.तर महाविकास आघाडीची एक जागा निवडून येऊ शकते.

दरम्यान, महायुतीच्या वाट्याला विधानसभेतील संख्याबळानुसार सहा जागा येणार असल्याने या जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये कसे होते, याकडे लक्ष असणार आहे. मात्र, भाजप चार आणि शिंदेसेना वा राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रातून हे सदस्य होणार निवृत्त

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, आरपीआय आठवले गटाचे रामदास आठवले, ठाकरे सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, भाजपचे डॉ. भगवत कराड, धैर्यशील पाटील आणि काँग्रेसच्या रजनी पाटील हे सात सदस्य ०२ एप्रिल २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत.

असे असेल संख्याबळाचं समीकरण

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ४० आमदार निवडून आले होते. या तिन्ही पक्षांचे मिळून २२८ आमदार आहेत. याशिवाय त्यांना सात आमदारांचा पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा असणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे १६ आणि ठाकरेंच्या सेनेचे २० आमदार आहेत. त्यामुळे मविआच्या तिन्ही पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. याशिवाय माकप आणि शेकापचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. तर ३७ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ ११ मते शिल्लक असतील. तसेच समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचा एक आमदार सोबत गेल्यास १४ मते अतिरिक्त असतील.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...