Friday, September 20, 2024
Homeनगरमहंत रामगिरींकडूनच परंपरा खंडीत

महंत रामगिरींकडूनच परंपरा खंडीत

पुणतांब्यात येवून योगीराज समाधी दर्शन न घेता गेले परत

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

- Advertisement -

श्रीक्षेत्र पुणतांबा व सराला बेट यांचे अनादिकाळापासून संबंध आहे. ब्रम्हलीन गंगगिरी महाराज नेहमीच योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पुणतांबा येथे येत होते. 200 वर्षापूर्वी गंगागिरी महाराज नाम सप्ताहाची घोषणा त्यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथूनच कामिका एकादशीच्या पर्वावर सुरु केली ते आणि गादीचे वारसदार यांनी ही परंपरा आजपर्यंत जपली. मात्र यंदाच्या एकादशिनिमीत्त आलेले महंत रामगिरी महाराज यांनी योगीराज चांगदेव महाराज मंदिरात जाऊन दर्शन न घेतल्याने भक्तांमध्ये तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. महंत रामगिरींनी ही परंपरा खंडीत केल्याची भावना भक्तांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणतांबा येथे आल्यानंतर प्रत्येक मठाधिपती किर्तनाच्या आगोदर किंवा नंतर योगीराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्रीक्षेत्र पुणतांबा येथून मार्गस्थ होत होते. मात्र नुकत्याच संपन्न झालेल्या कामिका एकादशी दिवशी गोदावरी धामचे मठाधिपती मंहत रामगिरी महाराज यांनी किर्तनाच्या आगोदर किंवा कीर्तन संपल्यानंतर योगीराजांच्या समाधीचे दर्शन घेतले नाही. ही बाब सर्वांनाच खटकली. एकादशीला आलेल्या भक्तामंध्ये यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर एका भक्ताने ही बाब मंहतांचे विश्वासू मधू महाराज यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यांनी विषयांतर करून मूळ प्रश्नाला बगल दिली. मात्र खासगीत ही बाब मंहतांच्या लक्षात आणून दिली.

अखेर मंहत रामगिरी महाराज हे काल (शनिवारी) एका खासगी कार्यक्रमासाठी पुणतांबा येथे आले व कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी थेट योगीराज चांगदेव महाराज मंदिरात जावून योगीराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण यांनी मंहतांचा यथोचित सत्कार करून गंगागिरी महाराज नाम सप्ताहाची पंरपरा जपतांना योगीराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी विसर पडू देऊ नका अशी विनंती केली. मंहत नेहमी प्रमाणे न बोलता स्मित हास्य करून मार्गस्थ झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या