Wednesday, September 2, 2026
Homeक्राईमAhilyanagar : रेशनचा 17 क्किंटल गहू काळ्याबाजारात नेण्याचा प्रयत्न

Ahilyanagar : रेशनचा 17 क्किंटल गहू काळ्याबाजारात नेण्याचा प्रयत्न

पोलीस, पुरवठा विभागाच्या संयुक्त कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

स्वस्त धान्य वितरण योजनेतील रेशनचा गहू अनधिकृतपणे दुसर्‍या बारदाण्यात भरून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी 17 क्विंटल गहू आणि पिकअप असा एकूण 5 लाख 1 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासह धान्य दुकानदाराविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुरवठा विभागाच्या सपना भोवते (वय 36) यांनी सरकारतर्फे कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून बारातोटी कारंजा, माळीवाडा येथे एका पिकअपमध्ये रेशनचा गहू आढळून आल्याची माहिती दिली. त्यानुसार सपना भोवते यांनी कार्यालयातील कर्मचारी तसेच दोन पंचांना सोबत घेतले आणि रात्री आठच्या सुमारास पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.

दत्त मंदिरामागे, सुरेश रासकर यांच्या दुकानाशेजारी पिकअप उभी असल्याचे पथकाला आढळले. वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक बारदाण्यात गहू भरलेला आढळून आला. वाहनात असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश दत्तात्रय रासकर (वय 42, रा. कानडे मळा, सारसनगर) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने हा गहू रास्तभाव दुकानदार सुरेश रासकर यांच्या सांगण्यावरून वाहनात भरल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पिकअप चालक प्रकाश रासकर आणि रास्तभाव दुकानदार सुरेश बबनराव रासकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 123 हरकती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हरकती दाखल...