Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकPolitical News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Political News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Ravindra Chavhan : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.

- Advertisement -

रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी आज माझ्यावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. आजच शिर्डी येथे भाजपा महाविजयी अधिवेशनाचीही सुरुवात झाली आहे. असे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स सोशल मिडिया वर प्रसिद्ध केले आहे.

ताज्या बातम्या

Dussehra

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल; सोने-चांदीसह ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रिअल इस्टेटमध्ये...

0
नाशिक | प्रतिनिधीसाडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणानिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवरात्रोत्सवापासूनच सुरू झालेल्या...