Tuesday, October 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा विक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा विक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाले असून महाराष्ट्र्रातील गुंतवणूक विक्रमी ठरली आहे. महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी एक्स या समाज माध्यमातून परकीय गुंतवणुकीबाबतची माहिती दिली. देशातील ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण २५ हजार ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानिमित्ताने दिली आहे.

 

 

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मुळातून बंधारे आणि शेतीसाठी प्रत्येकी एक आवर्तन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुळा उजवा कालव्यातून बंधार्‍यांना, पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एक आवर्तन तसेच मुळा डावा कालव्यातून जानेवारी ते मार्च 2027...