Thursday, October 1, 2026
HomeनगरAMC : रस्त्यात अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवा

AMC : रस्त्यात अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवा

मनपाने दिली सात दिवस मुदतीची नोटीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका हद्दीतील रस्त्यांवर आणि पदपथांवर वाहतुकीस अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवण्यासाठी महापालिकेकडून सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आले आहे. यासंदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांच्यावतीने जाहीर नोटीस जारी करण्यात आली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने यात म्हटले आहे.

- Advertisement -

या नोटीसमध्ये रस्त्यांच्या कडेच्या आणि पदपथांवरील मंदिरे, गुरूव्दारा, चर्च, दर्गा, मजार किंवा कबर यासारख्या वास्तूंमुळे सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रूग्णवाहिका आणि अग्निनशमन दलाच्या वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. संबंधितांनी ही अतिक्रमणे स्वतःहून सात दिवसांत हटवावीत किंवा त्यांचे स्थलांतर करावे, अन्यथा मुदतीनंतर ती बेकायदेशीर व अतिक्रमित समजून महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी 2017 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याला अडथळा ठरणार्‍या धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

यात शहरात 574 धार्मिक स्थळे असल्याची माहिती स्पष्ट झाली होती. या स्थळांची वर्गवारी केल्यानंतर त्यापैकी सुमारे 104 छोटी-मोठी धार्मिक स्थळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी महापालिकेने रस्त्याला अडथळा ठरणारी 17 धार्मिक स्थळे हटवली होती. मात्र, अल्पावधीतच ही मोहीम थांबवण्यात आली होती. कालांतराने या पाडलेल्या देवस्थानांपैकी अनेक देवस्थाने पुन्हा उभी राहिली आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...