नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात दिवसभरात ७१ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ५३ रूग्णांनी करोनावर मात केली.
- Advertisement -
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ७१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ५४ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १२, व मालेगाव मनपात ०२ तर जिल्हाबाह्य ०३ रुग्णाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात ग्रामीण भागातील ०२ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६३९ इतका झाला आहे.




