नाशिक । प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
- Advertisement -
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय येथील अपर आयुक्त अरुण आनंदकर, अजय मोरे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. झेंडावंदना नंतर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.