Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik News : शहरात परतीच्या पावसाची हजेरी

Nashik News : शहरात परतीच्या पावसाची हजेरी

ग्रामीण भागालाही झोडपलं, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक | Nashik

जिल्ह्यासह नाशिक शहरात (Nashik City) कालपासून परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हातातोडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काल सायंकाळच्या सुमारास पावसाने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाण्यासह आदी भागांत हजेरी लावली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरातील विविध भागांत हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार

आज सकाळी नाशिक शहरात कडक ऊन होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. त्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सिडको, मेनरोड, शालिमार, सीबीएससह आदी भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी (Water) साचल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काल नाशिक जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसावरही भाष्य केले. ते म्हणाले की,सध्या परतीचा पाऊस पडत असून भात पिकांचे मोठे नुकसान होतं आहे. बऱ्याच पिकांचे नुकसान होतं आहे. लोक म्हणत आहेत तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा, जरी आचारसंहिता असली तरी नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना नक्की सांगितले जाईल आणि पंचनामे केले जातील, असे अजित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या