Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकTrimbakeshwar : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आढावा

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आढावा

ग्रामपंचायत रोहिले, जि.प. शाळा तळवाडे येथे भेट

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत रोहिले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवाडे, पिंप्री अंगणवाडी येथे भेट देऊन पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे पंचायत समिती स्तरावरील विभागप्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी यांची बैठक घेतली.

- Advertisement -

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चासंदर्भात उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना निर्देश दिले व ज्या ग्रामपंचयतीच्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समिती त्रय पालक अधिकारी रवींद्र परदेशी पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गट विकास अधिकारी गजानन लेंडी व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिले येथे भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने जि.प. मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित ठेकदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवाडे येथे भेट देत शाळेचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथील बैठकीत पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चासंदर्भात उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना सुचना केल्या त्याचबरोबर आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाने यांची दुरुस्ती, अंगणवाडी केंद्र यांच्या डागडुजी व दुरुस्तीच्या कामांचा आराखडा तयार करण्याबाबत निर्देश दिले, तालुका पालक अधिकारी यांच्या अहवालानुसार उपस्थित अधिकारी यांना कामकाज करण्याच्या सूचना देखील यावेळी केल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या