Thursday, September 10, 2026
Homeक्राईमCrime News : रिक्षाचालकाला पळवून नेऊन मारहाण करणारा नेवाशात जेरबंद

Crime News : रिक्षाचालकाला पळवून नेऊन मारहाण करणारा नेवाशात जेरबंद

दोन गुन्ह्यांत होता पाहिजे || एलसीबीची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रिक्षाचालकाला जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेत शेतात नेऊन मारहाण केल्याप्रकरणी पसार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भानसहिवरे (ता. नेवासा) शिवारातून जेरबंद केले. चेतन संतोष सरोदे (वय 22, रा. बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता.

- Advertisement -

फैजान समीर सय्यद (रा. गोविंदपुरा) हे 24 जून रोजी रिक्षाचे भाडे घेण्यासाठी बोल्हेगाव चौकात गेले होते. त्यावेळी अज्जू सय्यद व त्याच्या मित्रांनी फैजान सय्यद यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून एका शेतात नेले. तेथे त्यांना मारहाण केल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन सरोदे हा पसार झाला होता. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार केले होते.

पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख, विजय ठोंबरे, गणेश धोत्रे, अमृत आढाव, सागर ससाणे, अभिजीत अरकल आणि विष्णु भागवत यांचा या पथकात समावेश होता. पथकाला पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी (14 ऑगस्ट) पथकाला बातमीदारामार्फत चेतन सरोदे हा नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तेथे जाऊन शोध घेतला असता चेतन सरोदे याला ताब्यात घेण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...