Thursday, May 14, 2026
Homeक्राईमCrime News : रस्ता वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण

Crime News : रस्ता वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण

8 जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे रस्त्याच्या वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीता दीपक भुजाडी (अंगणवाडी सेविका, रा. मुसळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, शेत व वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याबाबत त्यांचे व बाळासाहेब नामदेव भुजाडी यांच्यात दिवाणी वाद सुरू आहे. दि. 10 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या हस्तक्षेपाने मुसळवाडी शिवारातील गट क्र. 82 मधून गट क्र. 81 कडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला होता.

- Advertisement -

त्याच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चैतन्य किशोर भुजाडी यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यने सदर रस्त्यावर जनावरांचे शेणाचे ढिगारे लोटून रस्ता बंद केला. त्यावेळी नीता भुजाडी यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले असता, तेजश्री बाळासाहेब भुजाडी हिने त्यांच्या डोक्याचे केस ओढून पुढे कुठे व्हिडिओ काढायला चाललीस मागे हो असे म्हणत अडवले. दरम्यान, सुनीता भुजाडी, योगिता भुजाडी, कविता भुजाडी व हर्षदा भुजाडी यांनी नीता भुजाडी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुमचा या रस्त्याशी काही संबंध नाही अशी धमकी दिली. तर शोभा भुजाडी, अर्चना भुजाडी व भगवान बाळासाहेब तनपुरे यांनी शिवीगाळ केली.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सुनीता बाळासाहेब भुजाडी, योगिता किशोर भुजाडी, कविता अतुल भुजाडी, हर्षदा बाळासाहेब भुजाडी, तेजश्री बाळासाहेब भुजाडी, शोभा मोहन भुजाडी, अर्चना आप्पासाहेब भुजाडी, चैतन्य किशोर भुजाडी (सर्व रा. मुसळवाडी) व भगवान बाळासाहेब तनपुरे रा. पिंपळाचा मळा, राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...