Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: "सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं…"; लाडकी बहीण योजनेत कोट्यावधींचा घोटाळा,...

Rohit Pawar: “सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं…”; लाडकी बहीण योजनेत कोट्यावधींचा घोटाळा, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai
लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटलेय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार दलालीच्या दलदलीत इतके पोखरले गेलेय की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही, असे म्हणत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेला असताना यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी महायुती सरकारचा जीआर ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
हे सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहिण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा रोहित पवारांनी म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला होता. तर 23 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु 5 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी 3 कोटींची मान्यता दिली. १५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासकीय अध्यादेशामध्ये २०० कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या अध्यादेशात नमूद असले तरी २३ नोव्हेंबर २०२३ च्या अध्यादेशामध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे.

- Advertisement -

माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन रोहित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...