Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाWPL 2023 : आरसीबी-युपी वॉरियर्स आज आमनेसामने

WPL 2023 : आरसीबी-युपी वॉरियर्स आज आमनेसामने

मुंबई | Mumbai

महिला आयपीएलमध्ये (WPL 2023) आज युपी वॉरियर्स (UP Warriors) संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघासोबत मुंबईच्या डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर होणार आहे…

- Advertisement -

महिला आयपीएलच्या तेराव्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा सामना होणार आहे. युपी वॉरियर्स संघाची कमान अलीसा हिलीच्या खांदयावर असणार आहे. तर आरसीबी संघाचे कर्णधारपद स्मुती मंधानाकडे असणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामान्यचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस वाहिनीवर करण्यात येणार आहे.

आरसीबी आणि युपी वॉरियर्स संघांमध्ये झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात युपी वॉरियर्स संघाने आरसीबी संघावर १० विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला होता. आता आरसीबी संघाला पुन्हा पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्याचा युपी वॉरियर्स संघाचा प्रयत्न असणार आहे. मागील ५ सामन्यात पराभव स्वीकारलेला आरसीबी आपली पराभवाची मालिका खंडित करून स्पर्धेतील आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

“यांना जनाची नाही, तर किमान…”, भर विधानसभेत अजितदादा संतापले; नेमकं काय घडलं?

युपी वॉरियर्स संघाचे ४ सामन्यात २ विजय आणि २ पराभवांसह ४ गुण आहेत. गुणतालिकेत सध्या युपी वॉरियर्स तिसऱ्या स्थानावर आहे. युपी वॉरियर्स संघाला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात जायंट्स संघाचा युपी संघाने पराभव केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट

आरसीबी आणि युपी वॉरियर्स संघाची तुलना केल्यास युपी संघ अधिकच संतुलित दिसत आहे. आजच्या सामन्यात विजयासाठी युपी वॉरियर्स संघाचे पारडे थोडे जड दिसत आहे. दोन्ही संघांच्या स्पर्धेतील कामगिरीवर नजर टाकल्यास युपी वॉरियर्स संघाची कामगिरी आरसीबी संघाच्या तुलनेत अधिकच सरस आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या