Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी शहरात बिबट्या आल्याची अफवा

दिंडोरी शहरात बिबट्या आल्याची अफवा

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी शहरात सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर येथे बिबट्या आल्याचे वृत्त सर्वोतर पसरले, परंतु वनविभागाच्या तसेच ग्रामस्थांचा अथक शोधकार्य नंतरही बिबट्या न सापडल्याने बिबट्या दिंडोरी शिवाजीनगरात आल्याची अफवाच ठरली.

दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथे सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान बिबट्या आल्याची एका युवकाने सांगितले. शिवाजीनगरातील मोठ्या पटांगणात बिबट्याने पलायन केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी पटांगाकडे धाव घेतली. कुणीतरी वनविभागाला फोन केला व वनविभागाचे पथक सुद्धा दाखल झाले. हळूहळू ही सर्व गर्दी पटांगणाकडे वळली. त्यानंतर वनविभागाचे वनरक्षक, वनपाल व वनविभागाचे कर्मचारी ताफ्यासह हजर झाले.

बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते साहित्य बरोबर आणले होते. शिवाजीनगर येथे वाढलेल्या गवतात बिबट्या लपला असल्याची शयता गृहीत धरून शोध कार्य सुरू झाले. चार ते पाच जेसीबीच्या सहाय्याने गवत काढण्यात आले. त्याचबरोबर सर्व कर्मचार्‍यांनी कोपरे अन कोपरे तपासले. शेवटी कुठेच काही आढळून आले नाही.अखेरीस फक्त कुत्र्यांचे पायांचे ठसे दिसून आले. त्यानंतर बातमी देणाराचा शोध घेतला पण तो सापडला नाही.

शेवटी बिबट्या निघाला ही अफवाच ठरली. वनविभागाचे कर्मचारी त्यांची नियोजित सुट्टी रद्द करून कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांचा दिवस व वेळ वाया गेला. कुणीही प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याशिवाय अफवा पसरवून नागरिकांना भयभीत करू नये, असे आवाहन यावेळी वनविभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik TCS Case : निदा खानच्या अटकपुर्व जामिनाची सुनावणी ‘या’ तारखेला

0
नाशिकरोड |प्रतिनिधी| Nashik नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कंपनीत महिला सहकार्‍याच्या लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिचा अटकपूर्व...