Thursday, July 23, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा समाधी मंदिरावर उभारली श्रद्धेची गुढी

Shirdi : साईबाबा समाधी मंदिरावर उभारली श्रद्धेची गुढी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

हिंदू नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या समाधी दर्शनाने (Sai Baba Samadhi Darshan) व्हावी म्हणून गुरुवारी गुढीपाडवा सणानिमित्त (Gudi Padwa Festival) साईभक्तांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रूढी परंपरेनुसार साईबाबांच्या समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला तसेच सायंकाळी साईबाबांच्या सुवर्णरथची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

हिंदू नववर्षाचे स्वागत साई समाधीच्या दर्शनाने व्हावे ही प्रत्येक साई भक्तांची इच्छा असते. त्यामुळे गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून गुरुवारी प्रामुख्याने परिसरातील साईभक्तांनी साई समाधी दर्शन घेण्याकरिता सकाळ पासूनच गर्दी केली असल्याचे दिसून आले. यावेळी साईबाबा संस्थानकडून श्रद्धा व सबुरीची गुढी उभारण्यात आली. तसेच गुढीपाडव्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता शहरातून साईबाबांच्या पादुकांची सुवर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत (Procession) साईभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन साई नामाचा जयघोष केला.

गुढीपाडव्यानिमित्त साईबाबा संस्थाने किर्तन व भजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे व त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मिनी कचरे यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करण्यात येऊन साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत

0
मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी...