Thursday, March 13, 2025
Homeनगरसाईबाबांच्या दैनंदिन आरतीसाठी सामान्य साईभक्तांना पुढे उभे राहण्याचा मान

साईबाबांच्या दैनंदिन आरतीसाठी सामान्य साईभक्तांना पुढे उभे राहण्याचा मान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Sansthan) तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या मुहूर्तावर साईबाबांच्या दैनंदिन होणार्‍या मध्यान्ह, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना (Sai Devotee) पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ मध्याह्न आरतीवेळी करण्यात आला. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झांसी येथील मनीष रजक आणि पूजा रजक या साईभक्त (Sai Devotee) दांपत्याला हा मान मिळाला.

- Advertisement -

या साईभक्तांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या (Sai Devotee) समवेत करण्यात आला. ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम भक्तांच्या (Sai Devotee) भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...