Saturday, July 25, 2026
HomeनगरShirdi : साईभक्ताचे महादान; दीड कोटीच्या सोन्यात कोरलेले ‘ॐ साई राम’ साईचरणी...

Shirdi : साईभक्ताचे महादान; दीड कोटीच्या सोन्यात कोरलेले ‘ॐ साई राम’ साईचरणी अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई दरबारात रोजच भक्तीचे नवनवे अविष्कार बघायला मिळतात. गुरुवारी दुबई येथील एका साईभक्ताने 1,600 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची तब्बल 1 कोटी 58 लाख रुपये किमतीची, सोन्यात कोरलेली ‘ॐ साई राम’ ही दोन नावे साईचरणी अर्पण करून आपली मनोकामना पूर्ण केली. भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. ही माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

- Advertisement -

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो भाविक येतात. साईबाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात. अशाच दुबई येथील एका श्रद्धावान साईभक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरांत ॐ साई राम अशी दोन नावे अर्पण करण्याची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली. गुरुवारी या भक्ताने अत्यंत श्रद्धेने 1600 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची ही सुवर्ण अक्षरे श्री साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केली.

उजवा हात दान करत असताना डाव्या हातालाही कळू नये, या उक्तीप्रमाणे एवढी मोठी सेवा रुजू करूनही भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली. या सुवर्ण अक्षरांची विधीवत पूजा केल्यानंतर ही अक्षरे साईबाबा समाधी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणार्‍या दरवाज्यावर लावण्यात आली असून ही सुवर्ण अक्षरे सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या दानाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी संबंधित साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

सुवर्ण अक्षरातील ॐ साई राम हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा, भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे. मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करताच सोन्याच्या झळाळीने उजळून निघालेली ही पवित्र नावे प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत आहेत. हे सुवर्णांकित ॐ साई राम प्रत्येक भक्ताच्या हृदयाला थेट स्पर्श करत आहे. या अनमोल दानाने मंदिराच्या वैभवात भर घातली आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...