Monday, April 27, 2026
Homeक्राईमShirdi : धूमस्टाईलने साईभक्त महिलेच्या गळ्यातील 15 लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले

Shirdi : धूमस्टाईलने साईभक्त महिलेच्या गळ्यातील 15 लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई दर्शनासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर शिर्डीसह विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असताना चोरटे धुमस्टाईल महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व दुचाकी मोटरसायकल, मोबाईल सर्रासपणे चोरून नेत असल्याच्या घटना शिर्डी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने साईभक्त व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिर्डीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
शनिवारी 25 एप्रिल रोजी वीज खंडित झाल्याचा फायदा घेऊन दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी आंध्र प्रदेशातील महिला साईभक्त रत्नकुमारी वैंकट्टा यांच्या गळ्यातील तब्बल 15 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन क्षणार्धात लुटून पळ काढला. वीज गेली आणि चोरट्यांचा प्लॅन फत्ते केल्यानंतर पळ काढला.

- Advertisement -

शिर्डी नगर-मनमाड रस्त्यावर, जिथे भाविकांची वर्दळ कायम असते तिथे ही घटना घडली. गुंटूर-तेणाली येथून आलेले वैंकट्टा कुटुंब दर्शन आटोपून साई आश्रमकडे पायी निघाले होते. त्याचवेळी संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडित अंधार दाटलेला आणि हेल्मेट घातलेले दोन चोरटे दुचाकीवर पाठीमागून येत, थेट महिलेवर झडप घातली आणि 15 लाखांचा ऐवज हिसकावून क्षणार्धात फरार झाले. झाले धुम स्टाईल चोरांच्या रडारवर परराज्यातील साईभक्त महिला असून रेकी करून अशा प्रकारच्या चोरी केल्या जात आहेत. पो.नि. रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने मागील काही महिन्यांत गुन्हेगारीवर अंकुश आणल्याचे चित्र होते. मात्र दुचाकी चोरी व धुमस्टाईल चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

नगरपरिषदेचे महाराष्ट्र सुरक्षा पोलीस पथक त्या बरोबरच स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलिसाचा बंदोबस्त असताना या गुन्हेगाराची टोळी गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून लाखोंची लूट होऊनही साईबाबा संस्थान देखील कठोर पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यामुळे शिर्डीची प्रतिमा व संदेश चुकीचा जात असुन साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना जर रस्त्यावरच लुटले जात असेल, तर सुरक्षित शिर्डी आहे हे कसे म्हणता येईल या गंभीर बाबीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालावे असा सूर शिर्डी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे.

शिर्डीत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज तसेच मोबाईल व दुचाकी मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे साईभक व ग्रामस्थ यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. साई मंदिर गाभार्‍यात देखील काही दिवसापूर्वी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज व पर्स मधून पैसे चोरी गेल्याची घटना घडली होती. शिर्डी पोलिसांनी शहरातील वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...