Thursday, March 13, 2025
Homeनगरसाई मंदिर कळसाला दुसर्‍यांदा सुवर्ण मुलाम्याचे काम सुरू

साई मंदिर कळसाला दुसर्‍यांदा सुवर्ण मुलाम्याचे काम सुरू

साईबाबांचे सिंहासन, गाभारा, पंचारती ताट, साईंचे अभूषण सर्वच सोन्याचे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून सोळा वर्षानंतर दुसर्‍यांदा सुवर्ण मुलामा देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला सन 1992 मध्ये संत पारनेरकर महाराज यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कळस बसविण्यात आला.सन 2008 मध्ये हैदराबाद येथील दानशूर साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून सुवर्ण मुलामा देण्यात आला होता. तेव्हापासून अर्थातच 16 वर्षांत या सुवर्ण मुलाम्यास काही ठिकाणी तडे जाऊन पोपडे निघाले होते.

- Advertisement -

याबाबत दानशूर साईभक्त विजयकुमार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, सुवर्ण मुलामा दिलेल्या कळसाला विद्युत रोषणाई केली जात नाही. याचे अनेक उदाहरणे देता येईल. तिरुपती बालाजी, द्वारका आधी ठिकाणी कळसाला विद्युत रोषणाई केली जात नाही. विद्युत बल्बच्या तापमानामुळे सुवर्ण मुलामाला आपोआप तडे जात असल्याचे सांगून साईबाबा संस्थान प्रशासनाला याबाबत काळजी घेण्यात यावी आणि सुवर्ण मुलामा देण्यात आलेल्या कळसाला विद्युत रोषणाई पासून दूर ठेवावे असे सुचित करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वजय कुमार यांना साई मंदिराच्या कळसाला दुसर्‍यांदा सुवर्ण मुलामासाठी किती सोनं वापरले याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितले की, ते साईबाबांचेच आहे त्यामुळे त्याची वाच्यता करण्याची परवानगी बाबांनी मला दिलेली नाही.आणि ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. साई संस्थानकडे सन 2000 नंतर चांदीच्या दानाऐवजी सोन्याच्या देणगीत मोठी वाढ होत गेली. सन 2007 मध्ये साईभक्त आदिनारायण रेड्डी यांच्या देणगीतून 19 किलो 411 ग्राम वजनाचे सुमारे 1 कोटी 99 लाख 55 हजार रूपये किमतीचे सुवर्ण सिंहासन बसविण्यात आले. त्यानंतर हैद्राबाद येथील साईभक्त विजयकुमार यांनी मंदिराच्या गोपूराला आणि समाधी मंदिराच्या कळसाला सोने लावले.

गुरुस्थान, नंदादीप यासंह मंदिर परिसरातील श्री शनी, श्री गणेश, श्री शिव मंदिराचे कळसाला सोन्याचा मुलामा देणगीच्या स्वरूपात लावून दिला आहे. तसेच बाबांना सोन्याचे छोटे सिंहासन, सोन्याची मखर, पादुका, सोन्याची झारी इत्यादी विजयकुमार यांनी दान दिले आहे.तर आजमितीस द्वारकामाई, गुरुस्थान, समाधी मंदिरात सोन्याच्या पादुका बसाविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे द्वारकामाईतील साईबाबांच्या फोटोची फ्रेम देखील सोन्याची असून बाबांचा सटका ठेवण्यासाठी असणारा चौरंग सोन्याचा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...