Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा संशयित कॅमेऱ्यात...

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा संशयित कॅमेऱ्यात कैद; CCTV व्हिडीओ व्हायरल

मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री चाकूहल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानला सध्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. मात्र, खासगी सुरक्षा भेदून बंगल्यात घुसून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. आता, आरोपीचा फोटो समोर आला असून सडपातळ, अंगात टी-शर्ट आणि पाठीवर बॅग घेऊन आरोपी सैफच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एक सीसीटी फुटेज मिळाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फायर एग्झिटच्या पायऱ्यांवरुन घरात घुसला आणि कित्येकवेळ तिथेच उभा होता. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह राहतो, त्याच इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी कैद झाला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी चोरी, मारहाण व जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्या संहितेच्या सेक्शन 311, 312, 331(4), 331(6), 331(7) BNS या कलमातर्गत सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपीचा उद्देश हा चोरी करण्याचा होता की हल्ला करण्याचा होता, की आणखी दुसरा होता याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी याबाबत मोठा खुलासा केला असून घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयिताची ओळख पटली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत. पोलिसांनी परीसरातील हल्ल्यावेळीचा सर्व पुरावे गोळा केले आहेत.या परिसरात यावेळी या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते हे पोलिसांना शोधण्यास मदत झाली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ला करणारा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असू शकतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या