Saturday, July 25, 2026
HomeमनोरंजनSalim Khan : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार...

Salim Khan : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार सुरू

मुंबई । Mumbai

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक आणि सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी मिळताच सलमान खान आपल्या सर्व कामातून वेळ काढून तातडीने रुग्णालयात पोहोचला आहे.

- Advertisement -

सलीम खान यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत खान कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत पत्रक किंवा माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.

सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत आपल्या गाडीतून उतरून रुग्णालयाकडे धाव घेताना दिसत आहे. वडिलांच्या प्रकृतीबाबत असलेली धाकधूक त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. सलमानसह कुटुंबातील इतर सदस्यही रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलीम खान यांचा जन्म नोव्हेंबर १९३५ मध्ये इंदूर येथे झाला असून, हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात त्यांना अत्यंत प्रभावशाली लेखक मानले जाते. ‘शोले’, ‘जंजीर’ आणि ‘दीवार’ यांसारख्या अजरामर चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. १९६४ मध्ये त्यांनी सुशीला चरक (सलमा खान) यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला सलमान, अरबाज आणि सोहेल ही तीन मुले आणि अलविरा ही मुलगी आहे. पुढे त्यांनी अर्पिता हिला दत्तक घेतले. पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी सलीम खान यांनी प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांच्याशीही विवाह केला.

सध्या सलीम खान ९० वर्षांचे असून वाढत्या वयानुसार त्यांना काही शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत असल्याचे समजते. लीलावती रुग्णालयाबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, बॉलीवूडमधील अनेक कलाकार आणि मान्यवरांनी फोनवरून खान कुटुंबाची विचारपूस केली आहे. पुढील काही तासांत त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! CJP चे जंतरमंतरवरील आंदोलन अखेर मागे; केंद्र सरकारकडून सर्व...

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन...