Tuesday, August 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष खा. अखिलेश यादव उद्या मालेगाव दौऱ्यावर

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खा. अखिलेश यादव उद्या मालेगाव दौऱ्यावर

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

समाजवादी पार्टीतर्फे 18 ऑक्टोंबर 2024, शुक्रवार रोजी शहरातील अजीज कल्लु क्रीडांगणावर जनअधिकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अखिलेश यादव हे या सभेस संबोधित करणार आहेत. खा. अखिलेश यादव मालेगावी येत असल्याने इंडिया आघाडीचे नेते, पदाधिकार्‍यांसह शहरातील हजारोंंच्या संख्येने नागरिक या सभेस उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सचिव मुस्तकीम डिग्नेटी यांनी येथे बोलतांना दिली.

समाजवादी पार्टी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव मुस्तकीम डिग्नेटी, महानगरप्रमुख शाने हिंद निहाल अहमद यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुख खा. अखिलेश यादव यांच्यासह खा. इकरा हसन, प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी आदी नेते मालेगावी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अजीज कल्लू क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जनअधिकार सभेस मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली.

ताज्या बातम्या

दुचाकी घसरून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik पपया नर्सरीकडून एक्सलो पॉईंटच्या दिशेने जात असताना चुंचाळे फाटा येथील मीना ट्रेडर्सजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या...