Thursday, September 24, 2026
HomeनगरAccident News : समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात

Accident News : समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) मंगळवारी सकाळी कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक (Container and Truck Accident) दिल्याने भीषण अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की कंटेनरचे मोठे नुकसान झाले व महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मात्र, अपघात (Accident) घडताच जेऊर कुंभारीतील नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे आणि तत्परतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

सकाळच्या व्यायामासाठी जात असताना बाळासाहेब वक्ते, लहाणू गायकवाड आणि संतोष गायकवाड यांच्या ही घटना निदर्शनास आली. अपघाताची तीव्रता पाहून या तिघांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरमध्ये (Container) अडकून पडलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याला यशस्वीपणे बाहेर काढले. या तिघांच्या प्रसंगावधानाचे व माणुसकीचे जेऊर कुंभारी परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

अपघातानंतर बोलताना बाळासाहेब वक्ते म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना चालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेगावर नियंत्रण ठेवावे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांबाबत अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी वाहनचालकांना केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...