Friday, July 24, 2026
HomeनगरSangamner : संगमनेरातही भोंदूबाबा; दुर्धर आजार बरे करण्याचा दावा

Sangamner : संगमनेरातही भोंदूबाबा; दुर्धर आजार बरे करण्याचा दावा

अंनिसकडून कारवाईची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच संगमनेर तालुक्यात आणखी एक भोंदूबाबाचे प्रकरण समोर आले आहे. वडगाव पान येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज लोकांकडून पैसे उकळत दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याबाबत अंनिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला ‘गडगे महाराज’ म्हणून ओळख करून देणारी ही व्यक्ती मंत्रोच्चार व कथित चमत्कारांच्या माध्यमातून शारीरिक आजार बरे करत असल्याचे सांगतो. या दाव्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी होत असून अनेकजण उपचाराच्या आशेने येथे येत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित बाबाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

‘दत्तधाम सरकार’ नावाने उभ्या केलेल्या याठिकाणी भक्तांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात उतरली आहे. हा प्रकार कोणताही चमत्कार नसून नागरिकांचे आर्थिक व मानसिक शोषण असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. याप्रकरणी तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित आश्रमावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आपण केवळ पुजेचे पैसे घेतो. अन्य कोणतेही पैसे घेत नाही असा दावा या बाबांनी केला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...