Monday, December 2, 2024
Homeक्राईमसंगमनेरात धूमस्टाईलने दोन महिलांचे दागिने ओरबाडले

संगमनेरात धूमस्टाईलने दोन महिलांचे दागिने ओरबाडले

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरात पुन्हा एकदा धूमस्टाईलने दागिने चोरीचे (Jewelry Theft) सत्र सुरू झाल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि. 29) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील गंठण अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकली आहे. यामुळे पोलिसांपुढे हे सत्र रोखण्याचे आव्हान ठाकले आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाजवळ आणि बारा वाजेच्या सुमारास यशोधन कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी (Jewelry Theft) वर्षा सुधाकर देशमुख (रा. जाखुरी, ता. संगमनेर) व मनीषा रमेश तरटे यांच्या गळ्यातील प्रत्येकी 40 हजार व 30 हजार रुपयांचे मिनीगंठण धूमस्टाईलने ओरबाडले.

यावेळी महिलांनी आरडाओरडा केला असता लोकांची मोठी गर्दी (Crowd) झाली होती. मात्र, तोपर्यंत चोरटे आपला कार्यभार उरकून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी वर्षा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner City Police) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. हासे हे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या