Tuesday, February 10, 2026
HomeनगरSangamner : संगमनेरातील कत्तलखान्यावर ‘एलसीबी’ची कारवाई

Sangamner : संगमनेरातील कत्तलखान्यावर ‘एलसीबी’ची कारवाई

11 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त || अकरा आरोपींवर गुन्हा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

वारंवार कारवाया करुनही संगमनेर (Sangamner) शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) मंगळवारी (दि.10) पहाटे कारवाई करुन तब्बल 11 लाख 6 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करत अकरा आरोपींवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter) करणार्‍या ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दीपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत आढाव, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन त्यांना संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter) करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देवून रवाना केले.

YouTube video player

सदर पथक मंगळवारी (दि 10) पहाटे शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मोगलपुरा येथे अतीक उर्फ सोनू रफीक कुरेशी व सलीम रियाज कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल (Slaughter) करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जावून खात्री केली असता काही इसम गोमांस टेम्पोमध्ये भरताना दिसून आले. पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांचा पाठलाग करता खोलीमध्ये फैज अश्पाक कुरेशी (वय 22, रा. गल्ली नं.2 मदिनानगर, संगमनेर), सद्दाम मोहमद जावेद कुरेशी (वय 29, रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर), कलीम सलीम सय्यद (वय 36, रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर), मुलमफरीद जावेद कुरेशी (वय 32, रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर), अनस गुलामसरवर कुरेशी (वय 21, रा. अलकानगर, संगमनेर), फैसल जाकिर कुरेशी (वय 20, रा. गल्ली नं.1 मदिनानगर, संगमनेर), जुनेद अयाज कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) हे मिळून आले.

त्यांच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता अतीक उर्फ सोनू रफीक कुरेशी (रा. मोगलपुरा, संगमनेर), सलीम रियाज कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) व हाश्मी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) आणि टेम्पोचा (क्र.एचएच.14, सीडी.0839) मालक (नाव माहिती नाही) अशी नावे सांगितली. या कारवाईत पथकाने 5 लाख 40 रुपये किमतीचे 1800 किलो गोमांस, 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो, 12 हजार रुपये किमतीची एक रिक्षा, एक हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा व तीन हजार रुपये किमतीचे एक लोखंडी कुर्‍हाड, दोन चाकू, एक काणस असा एकूण 11 लाख 6 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या