Thursday, March 13, 2025
Homeक्राईमसंगमनेरातील कत्तलखान्यांना पोलीसच जबाबदार?

संगमनेरातील कत्तलखान्यांना पोलीसच जबाबदार?

कत्तलखान्यांवर कारवाईस पोलिसांचा नकार असल्याचे उघड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांना पोलीसच जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कत्तलखान्यांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गोवंश जनावरे पाहूनही पोलिसांनी या कत्तलखाना चालकांवर कारवाई केली नसल्याची माहिती हाती आली आहे. याला पोलीसच अभय देत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. सोमवारी रात्री एका कत्तलखान्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अनेक जनावरे काही पोलिसांच्या निदर्शनास आली. मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली.दुसरीकडील कारवाई दाखवून पोलीस ठराविक कसायांना पाठीशी घालत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

सोमवारी पोलीस रात्र गस्त घालत होते. त्यांनी शहरातील काही ठिकाणी छापा टाकण्याचे ठरवले होते. शहरातील एका कत्तलखान्यात गेले. गोपनीय खबर्‍याकडून माहिती घेतली असता तेथील मोठ्या कसाईच्या वाड्यात गेले.तेथून त्यांना घराची माहिती मिळाली. तेथे दरवाजा उघडत नव्हता, परंतु एका पोलिसाने हिंमत दाखवत दरवाजा उघडला. तेथे संपूर्ण रक्ताचा सडा दिसला. ते विचारपूस करणार त्यातच एका पोलीस कर्मचार्‍याचा फोन चालकाला आला. तेथे काय करता तुम्ही तेथून निघून पुढे या असे या कर्मचार्‍यांनी इतर पोलिसांना सांगितले.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याचे त्यांनी या पोलीस कर्मचार्‍याला सांगितले असता समोरच्याने त्यांना माघारी फिरण्यास सांगितले. शेवटी हताश झालेले कर्मचारी दुसर्‍या ठिकाणी कारवाई करून निघून आले. मात्र, त्या कसायाला वाचवण्यात खाकीला इतके स्वारस्य का? कोणाच्या शब्दावर संबंधित कर्मचार्‍याने कारवाईला गेलेल्यांना मागे फिरायला सांगितले?, त्या मोठ्या कसायला कोण पाठीशी घालते? असे प्रश्न संगमनेरकरांना पडले आहेत. या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...