Saturday, August 29, 2026
Homeनगरसंगमनेरातील पर्यटक सुरक्षित; नेपाळमधून आज अयोध्येकडे रवाना होणार

संगमनेरातील पर्यटक सुरक्षित; नेपाळमधून आज अयोध्येकडे रवाना होणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

नेपाळमधील खराब हवामान आणि रस्ते वाहतुकीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील एनजॉय टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळ पर्यटनासाठी गेलेला ४५ पर्यटकांचा ग्रुप सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील २७ प्रवाशांचा समावेश असून हा सर्व ग्रुप नेपाळमधील लुंबिनी येथे सुखरूप पोहोचला आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षेची खात्री केली असून हे सर्व भाविक व पर्यटक आज (शनिवारी) भारताच्या दिशेने म्हणजेच अयोध्येकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करून उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री विखे-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत चर्चा केली. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्समधील सर्वांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून, त्या सर्वांचा भारताच्या दिशेने सुखरूप प्रवास सुरू आहे.

नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाल्याने राज्यातील पर्यटकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंत्रालयात कक्ष स्थापन केला आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या संदर्भात माहिती नोंदविण्यासाठी हींः // सशोरीिंळरश्र. ारहरीशेल. ळप/डरहरूरींउर्सीश्रष / ही लिंक देण्यात आली असल्याची माहिती मंत्री विखे-पाटील यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष निर्माण केला असून, ०२४१-२३२३८४४ आणि २३५६९४० या क्रमांकांसह १०७७ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले आहेत, नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये कोणी अडकले असतील तर त्यांच्या कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री विखे-पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याआधीच पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

0
हनुमंतगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील पाथरे-कोल्हार रस्त्यावरील जगदंबा माता मंदिर परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांच्या टोळीचा लोणी पोलिसांनी...