Sunday, May 10, 2026
Homeनगरसंगमनेर : आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या वृध्दाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यु

संगमनेर : आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या वृध्दाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यु

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

अंगावर रॉकेल ओतून तहसील व शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या वृध्दाचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात

- Advertisement -

काल दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यु झाला. अनिल शिवाजी कदम (वय 73 रा. खांडगाव) असे या वृध्दाचे नाव आहे.

भाडेकरी सादिक शेख व सुमैय्या शेख हे आपल्याला फार त्रास देत असल्याचे अनिल कदम यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी सर्व संबंधित अधिकार्‍यांना व पदाधिकार्‍यांना निवेदन पाठविले होते. त्यांच्यावर कारवाई करुन मला न्याय द्यावा अन्यथा आपण प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करु असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

निवेदन देवूनही प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने अखेर प्रजासत्ताक दिनी कदम यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी हा प्रकार बघताच त्वरीत धाव घेत त्यांंच्या अंगावर चादर टाकून विझवले. यावेळी ते भाडेकरुंच्या त्रासाबद्दल मोठमोठ्याने ओरडत होते. या आगीत सदर वृध्द गंभीररित्या भाजले होते. उपचारासाठी त्यांना त्वरीत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काल त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यु झाला. प्रशासनाच्या अधिकारी, पदाधिकार्‍यांना अन्यायाची कल्पना देवूनही कोणीच गांभीर्य घेतले नाही. अखेर न्याय मिळवता मिळवताच वृध्दाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेबाबात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांंच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर; CSK समोर LSG चे...

0
मुंबई | Mumbai आयपीएल (IPL) स्पर्धेचा १९ वा हंगाम निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असून, अंतिम ४ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अजूनही १० संघ शर्यतीत...