Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: ‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची…’ त्या गर्जनेचं म्याव का झालं? संजय...

Sanjay Raut: ‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची…’ त्या गर्जनेचं म्याव का झालं? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | Mumbai
मराठी सक्तीच्या मुद्द्यात काल मंत्रालयात बैठक झाली. ज्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीसाठी वेळ वाढून देण्यावर भाष्य केले. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी परिवहन भवनमध्ये ५९ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) बैठक होणार आहे. या बैठकीत सक्ती कधीपासून लागू करायची याचा निर्णय होईल. यावरूनच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांवर जोरदार टीका केली.

‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची…’ त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं?
मराठीच्या प्रश्नावर सरकार मागे हटत असेल तर, ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांची मध्ये गर्जना होती, ‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची…’ त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं? कशाला तुम्हाला मागे हटायचं आहे? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, कशाकरिता तुम्हाला मागे हटायचे आहे? शिकतील ना मराठी… तुम्ही कायदा करा.. १ मे पासून नियम बनवा. नियम बनवल्यावर त्यांना ६ महिन्यांची मुदत द्या. ज्यांना येत नाही, त्यांनी शिकावे. मराठी अत्यंत सोपी, सरळ आणि रसाळ भाषा आहे, ती अवघड नाही. मराठीच्या प्रश्नावर जर सरकार मागे हटत असेल तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला पाहिजे.

उदय सामंतांसोबत खलबतं, बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधान परिषद निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी

सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान
संजय राऊत म्हणाले, “रिक्षा-टॅक्सी चालकांनी सोयीसाठी मराठी शिकलं पाहिजे. पण, सरकारला आव्हान देण्याची भाषा केली जाते. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान आहे. सरकार कुणाचेही असुदे. देवेंद्र फडणवीसांनी मध्ये गर्जना होती, ‘महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची…’ त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं? कशाला तुम्ही मागे हटत आहात?

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा देत मराठीसाठी लढायला पाहिजे. का मुदतवाढीच्या गुंतवणुकीत अडकून पडणार आहेत?” असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी सरनाईकांवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरी, नेवाशातील भेसळखोरांना दणका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारताच अहिल्यानगर जिल्ह्यात अन्न भेसळविरोधी मोहिमेला वेग आला असून येथील अन्न व औषध...