मुंबई | Mumbai
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे पक्षाची जोरदार बाजू मांडत आहेत. त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून प्रसार माध्यमांना देण्यात येत आहे. तर याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांसोबतच निवडणुक आयोगावरही निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला विकले असून यामध्ये अमित शहा दलाल आहेत, असा आरोपच राऊतांनी केला आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलत आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.
ते खरे बौद्धिक नक्षलवादी आहे
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी निवडणुक आयोगावर निशाणा साधत सरकारवर गंभीर आरोप केले खरे बौद्धिक नक्षलवादी हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष आहेत. ज्यांनी बेकायदेशीर निर्णय देऊन संविधान गाडले, ज्यांनी विधिमंडळातील फूट हीच पक्षातली फूट मानून पक्ष विकला, ते खरे बौद्धिक नक्षलवादी आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय घेतले आहेत, असा टोला राऊतांनी तप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘बौद्धिक नक्षलवादी’ या शब्दाचा संदर्भ देत लगावला आहे.
ओला-उबेर-रॅपिडोवर सरकारचा ‘ब्रेक’! १ सप्टेंबरपासून नियम बदलणार
निवडणुक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला विकले
तसेच, निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला विकले. मी थेट सांगतोय, निवडणूक आयोग विकत घेतला गेला आहे. यात हजारो कोटींचा व्यवहार झाला असून त्यामध्ये दलालीचे काम अमित शाह यांनी केले आहे, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, असा गंभीर आरोपच राऊतांनी केला आहे. तर, कपिल सिब्बल यांनी उत्तम युक्तिवाद केला. हा निकाल आधी द्या, पुढची गाडी आपोआप सुरळीत होईल. सध्या एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या विधानांवरून असे दिसते की, सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात संविधानाचा आणि न्यायाचाच विजय होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.




