Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान, …यावे जागराला यावे…" ;संजय राऊतांनी मोदींसह 'या'...

Sanjay Raut: “मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान, …यावे जागराला यावे…” ;संजय राऊतांनी मोदींसह ‘या’ नेत्यांना विजयी मेळाव्याचे धाडले निमंत्रण

मुंबई | Mumbai
पहिली ते तिसरी अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या समावेशासंदर्भातील दोन्ही जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हिंदीच्या सक्तीविरोधात दोन्ही पक्षांनी ५ जुलै रोजी मुंबईत विशाल मोर्चाची हाक दिली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने आदेश मागे घेतल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून विजयी जल्लोष साजरा केला जाणार असून हा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये पार पडणार आहे.

- Advertisement -

या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ठाकरे बंधूंचं हा विजयी मेळावा 5 जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार?, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे विजयी मेळाव्याचे पत्रक शेअर केले आहे. या पत्रकामध्ये वाजत-गाजत येण्याचे आवाहन केले आहे.

संजय राऊतांनी मोदी, अमित शाहांसह कोणा कोणाला निमंत्रण दिले?
संजय राऊत यांनी या विजयी मेळाव्याचे निमंत्रण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत दिले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड…यावे जागराला यावे…, असेही संजय राऊतांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.

वाजत गाजत गुलाल उधळत या
आवाज मराठीचा !
मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…!
कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.
त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!
आपले नम्र
राज ठाकरे – उद्धव ठाकरे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...