Friday, October 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसंजय राऊतांचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा; सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याबाबतच्या वक्तव्यांवर व्यक्त...

संजय राऊतांचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा; सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याबाबतच्या वक्तव्यांवर व्यक्त केला खेद

मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आता सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाची प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि अधिकार कमी करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केले आहे.

प्रतिज्ञापत्रातून बिनशर्त माफी
संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या वक्तव्यांबद्दल बिनशर्त, पूर्ण आणि स्वेच्छेने माफी मागितल्याचे नमूद केले आहे. न्यायालयाचा किंवा सरन्यायाधीशांचा अनादर करणे, न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणे अथवा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हा आपला उद्देश नव्हता, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या काही विधानांमुळे न्यायव्यवस्थेबाबत अनुचित आरोप केल्याची भावना निर्माण झाली असेल, तर त्याबद्दल खेद व्यक्त करत असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

विधान परिषद निवडणुक निकाल २०२६: पाच जागांचे निकाल जाहीर; नागपूरमध्ये मोठा उलटफेर, महायुती २ तर मविआ ३ जागांवर विजयी

नेमकं प्रकरण काय आहे?
खासदार संजय राऊत यांनी अल्बानियामधील हिंसक आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी, तेथील लोकांनी भ्रष्ट पंतप्रधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाला आग लावली आणि सरकारी इमारतींवर हल्ला केला, असे लिहिले होते. या पोस्टमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटली, भाजप त्यांच्यावर अराजकता पसरवणे, हिंसाचार भडकवणे आणि न्यायालयाला धमकी दिल्याचा आरोप केला. यानंतर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणाची जय्यत तयारी; धर्मध्वजावरील शुभचिन्हे ठरणार आकर्षण

0
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधीत्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ बाजून २ मिनिटांनी कुशावर्त तीर्थ येथे...