Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसंजय राऊतांनी शेअर केला मोदी-गांधींचा 'तो' फोटो; म्हणाले, "ये तो…"

संजय राऊतांनी शेअर केला मोदी-गांधींचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “ये तो…”

मुंबई | Mumbai

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवार (दि.२४) पासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा (MP) शपथविधी पार पडला. त्यानंतर आज बुधवार (दि.२६) रोजी सकाळी उर्वरित काही खासदारांचा शपथविधी (Swearing) पार पडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये उपाध्यक्षपदावर असहमती झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) केरळमधील खासदार के.सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली होती.त्यामुळे ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच संसदेत (Parliament) निवडणूक पार पडली. यावेळी आवाजी मतदान प्रक्रियेत हंगामी अध्यक्षांनी ओम बिर्ला (OM Birla) यांना विजयी घोषित केले.

हे देखील वाचा : सहा वर्षांपूर्वी ‘गळाभेट’ आता ‘हस्तांदोलन’!

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केले. यावेळी ओम बिर्ला यांनी खुर्ची स्वीकारल्यानंतर या तिघांनीही त्यांचे हस्तांदोलन करून अभिनंदन केले. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक फोटो एक्स (ट्विट) वर पोस्ट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी कौन राहुल म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. त्याचीच आठवण करून देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना राऊतांनी म्हटले आहे की, “हा हा हा हा… कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?” असे म्हणत राऊत यांनी मोदींना डिवचले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या