Sunday, October 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'एक कॉकरोच सरकार को हि#$ बना देती है'; कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावरुन...

‘एक कॉकरोच सरकार को हि#$ बना देती है’; कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावरुन राऊतांची सरकारवर टीका

मुंबई | Mumbai
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून शनिवारपासून दिल्लीत आंदोलन छेडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड पोलीस आणि निमलष्करी फौजफाटा तैनात करण्यात आला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केले आहे. आगामी काळात देशामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार राऊतांनी केला आहे. दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.

संजय राऊत काय म्हणाले?
हे जनतेच बंड आहे, सरकार ते थांबवू शकत नाही. या सरकारच्या अध:पतनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंदोलकांना रोखले जात आहे. या सरकारमध्ये राज्यकर्ते नाहीत, तर व्यापारी आहेत. ‘एक कॉकरोच सरकार को हि#$ बना देती है’, या अभिनेता नाना पाटेकर यांच्या डॉयलॉगचा उल्लेख करत संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारने दिल्लीला जम्मू काश्मीर केले आहे. तब्बल 15000 वाहने दिल्लीबाहेर अडकून पडली आहेत. ट्रेन रोखण्यात आल्या आहेत. ट्रेनमधून आंदोलन जाणाऱ्यांना रोखले जात आहे. गृहमंत्री 56 इंचाची छाती असल्याचे सांगत होते, ते आता कोणाला घाबरत आहेत. दिल्लीत काय सुरु आहे, हे तेथील मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

मोठी बातमी! जंतर-मंतर आंदोलनापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; ध्रुव राठी गुरुग्राममधून ताब्यात

एप्रिल महिन्यात सरकार कोसळेल
यावेळी बोलताना त्यांनी थेट एप्रिल महिन्यात सरकार कोसळेल आणि देशात पर्यायी सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, “पोलिसांनी कोणतेही बेकायदेशीर आदेश पाळू नयेत,” असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीतील आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार असून हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे आव्हानही संजय राऊतांनी सरकारला दिले आहे.

पंतप्रधान मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल
विरोधकांविरोधात दमनशक्तीचा वापर सुरु आहे. आणीबाणीच्या काळातही हेच घडले होते. नरेंद्र मोदी, अमित शाह, सुवेंदू अधिकारी सत्तेवर आहेत, हे व्होटचोरीचे उदाहरण आहे, असे राऊत यांनी म्हटले. यु-ट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले, हे सरकार दुसरे काही करु शकत नाही. एप्रिलनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. अमित शाह यांना जनतेच्या बंडाने फरक पडत नाही. पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल. ब्रिटिश आपल्या देशात परतले तेव्हा पर्यायी सरकार स्थापन झाले होते, तसे सरकार आता येऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या