Tuesday, October 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशंभर कोटीच्या वसुलीवरुन अनिल देशमुखांवर कारवाई, मग ५०० कोटींच काय? संजय राऊतांचं...

शंभर कोटीच्या वसुलीवरुन अनिल देशमुखांवर कारवाई, मग ५०० कोटींच काय? संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र

मुंबई | Mumbai
“भाजपने आतापर्यंत खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या; आता आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली का?” असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पत्रामुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

अमित शाहांना पत्र लिहून काय मागणी केली?
संजय राऊत यांनी अमित शाह यांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख करत, एवढी मोठी रक्कम कुठून आली आणि ती नेमकी कुठे गेली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात मनी लाँडरिंगचा संशय व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि ED मार्फत तपास करण्याची मागणी केली. कथित व्यवहारातील पैशांचा स्रोत, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि रक्कम प्रत्यक्षात कोणापर्यंत पोहोचली, याचा शोध घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. राऊत यांनी आपल्या पत्रात भाजपवर राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्याचे आरोप करत आता आंदोलनांनाही लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला. हे त्यांचे राजकीय आरोप असून, त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

Respected Shri @AmitShah ji The ₹500 crore matter in Maharashtra must have surely reached you by now. Until now, the BJP has been buying MPs, MLAs, political parties and elections. Now it has begun buying agitations as well. The BJP handed over money to Shrikant Shinde so that ₹500 crore could be given to Manoj Jarange Patil. Where did this money come from? And did it actually reach Jarange or not? This is a matter under the Prevention of Money Laundering Act (PMLA). Kindly entrust the investigation to the Enforcement Directorate (ED). @Dev_Fadnavis @PMOIndia @BJP4India @RSSorg— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2026

- Advertisement -

आता आंदोलनेही विकत घ्यायला सुरवात केली
आतापर्यंत भाजप खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेत होता. आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे,” असा टोलादेखील भाजपला लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी असेही म्हटले आहे की, “भाजपने श्रीकांत शिंदेंच्यामार्फत मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये दिले आहेत. हे पैसे कुठून आले? आणि ते खरोखर जरांगेंच्यापर्यंत पोहोचले की नाही? या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी,” असेही त्यांनी या पत्रात मागणी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून खासदार संजय राऊतांनी या प्रकरणात आधी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीच्या आरोपांचाही उल्लेख राऊतांनी केला. ते म्हणाले, “तुमच्या नेतृत्वाखाली, ईडी भारतातील मनी लाँड्रिंग प्रकरणांचा तपास करण्यात आघाडीवर राहिली आहे. अगदी कमी रकमेचा समावेश असलेल्या प्रकरणांचाही तपास करण्यासाठी ईडीने नाव कमावले आहे. मार्च २०२१ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करून देण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांनी कोणताही पुरावा न देता केवळ आरोप केला होता, तरीही ईडीने अत्यंत तत्परतेने कारवाई करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. त्याच्या तुलनेत, मनोज जरांगे पाटील यांनी केलेले खुलासे अधिक गंभीर आहेत, कारण त्यांनी ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात स्पष्ट आणि नाकारता न येणारा पुरावा दिला आहे आणि यातील रकमेचा आकडाही खूप मोठा आहे.”

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सायबर गुन्ह्यातील रक्कम पेट्रोलपंपाच्या खात्यात; जिल्ह्यात ​क्यूआर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik वैद्यकीय आणि कौटुंबिक आणीबाणीचे भावनिक कारण सांगून पेट्रोल पंपांवरून रोख रक्कम (कॅश) उकळायची, त्याबदल्यात क्यूआर कोडद्वारे (QR Code) पंपाच्या खात्यात...