Tuesday, December 3, 2024
Homeजळगाव23 तारखेनंतर ‘ते’ विधानसभेत दिसणार नाहीत-खा.राऊत

23 तारखेनंतर ‘ते’ विधानसभेत दिसणार नाहीत-खा.राऊत

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना आमदार, खासदार व मंत्री केले. पण त्यातील काही शेवटी लायकीवरच गेले. अशांना घरी बसविण्याची वेळ आता आली असून, 23 तारखेनंतर ते तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही, अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धरणगावात केली. राऊत यांचा रोख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे होता.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ धरणगावातील कोट बाजारातील जाहीर सभेत खा.राऊत बोलत होते. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना गुलाबराव पाटील धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात उद्योग आणले नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिपद दिले मात्र सगळे विसरून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात निष्ठेच्या गप्पा मारायचे मात्र आज ते निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, असेही खा.राऊत म्हणाले.

धरणगाव शहराचा कायापलट करणार-देवकर
गेल्या 10 वर्षात जळगाव ग्रामीणचा विकास खुंटला आहे. धरणगावात 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. अनेक बेरोजगार कामासाठी जळगावला जाताना दिसतात. अवैध धंद्यांना सगळीकडे ऊत आला आहे. वाळू उपाशामुळे नद्यांची पात्रे पोखरली गेली आहेत, याकडे लक्ष वेधून सेवेची संधी मिळाल्यास सर्वप्रथम धरणगाव शहराची पाणी टंचाई दूर केली जाईल. एखादा मोठा उद्योग आणून धरणगाव तालुक्याचा कायापलट करू असे आश्वासन देवकर यांनी दिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या