Thursday, March 13, 2025
Homeनगरचौथ्या दिवशी दैनिक सार्वमत ‘शॉपिंग एक्स्पो’ ला गर्दीचा उच्चांक

चौथ्या दिवशी दैनिक सार्वमत ‘शॉपिंग एक्स्पो’ ला गर्दीचा उच्चांक

आज एक्स्पोचा शेवटचा दिवस, महिलांच्या आग्रहास्तव आज पुन्हा ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग महोत्सव 2025 ला चौथ्या दिवशी शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली. दरम्यान यानिमित्त आयोजित ‘खुल्या सोलो डान्स’ कार्यक्रमाचा कलाकारांनी व प्रेक्षकांनी तसेच ग्राहकांनी मनसोक्त आनंद लुटला. दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवासाठी सहप्रायोजक म्हणून साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी, राहुरी फॅक्टरी व वासन टोयोटा अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले आहे. काल अनेक मान्यवरांनी या एक्स्पोला सदिच्छा भेट दिली. या खरेदी महोत्सवात पहिल्या तीन दिवसांपासून ग्राहकांची गर्दी सुरू झाली.

- Advertisement -

यामध्ये ग्राहकांना खरेदी बरोबरच मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. तसेच खवय्यांसाठीही विविध चमचमीत खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये अनेक खवय्यांनी जय महाराष्ट्र चायनिज कॉर्नरच्या ड्राई संचुरियन, फ्राईड राईस, ग्रेव्ही मंचुरियन, हक्का नुडल्स, बटर दाबेली, सेजवान राईस, मसाला बटाटा स्पाईरल, पेरी पेरी बटाटा स्पाईरल, खिचीया पापड, चीज पापड, मसाला पापड, सोयाबिन चिल्ली आदी खाद्य पदार्थांवर चांगलाच ताव मारला. तर मावा कुल्फी खाण्याचा आनंदही घेतला. नंतर अनेकांनी कोल्ड पाणीपुरीवर ताव मारला.

मनोरंजनाच्या कार्यक्रमात खास स्थानिक कालाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या गटातील सोलो डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नृत्याविष्काराचा उपस्थित रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. सोलो डान्स मध्ये महेश पाटील, सौरभ गवारे, स्वराज निकम, पार्थ मुळे, इंजि. प्रल्हाद अग्रवाल, श्रध्दा खंडीझोड, प्रणिता किशोर वाडिले, सोहम साळुंके, स्वरा गोसावी, आयुष काचेरिया, उपासना गुलाटी, परी महांकळे, दर्शन वाघ, खुशी राठोड, ओवी काळे, श्रीशा मराठे, रोशनी वैष्णव, आर्या कांबळे, प्रज्वल संदीप सोनवणे, वैष्णवी संजय धुरिया, नंदीनी संजय धुरिया आदींनी सहभाग घेवून नृत्याविष्कार सादर केला. सहभागी प्रत्येक कलाकाराचा दैनिक सार्वमतच्यावतीने संपादक अनंत पाटील, वृत्तसंपादक अशोक गाडेकर व जाहिरात व्यवस्थापक विनोद नेवासकर यांच्याहस्ते भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीमखान पठाण यांनी केले.

या खरेदी महोत्सवाचा आज दि. 3 फेब्रुवारी शेवटचा दिवस असून महिला भगिनींच्या आग्रहास्तव खास महिलांकरिता पुन्हा अँकर प्रवीण जमधडे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. महिला भगिनींनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित रहावे, यातील विजेत्या महिलांना खास ‘पैठणी’ देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

आज पुन्हा ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 मध्ये आज शेवटच्या दिवशी महिला भगिनींच्या आग्रहास्तव पुन्हा अँकर प्रविण प्रस्तूत ‘खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाग्यवान ग्राहक सोडत
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 ला भेट देणार्‍या ग्राहकांना कुपन देण्यात येत असून त्यातून दररोज लकी ड्रॉ पध्दतीने भाग्यवान ग्राहक निवडला जात आहे. या ग्राहकास मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येत आहे. भाग्यवान ग्राहक सोडतीचा निकाल दै. सार्वमतच्या अंकामध्ये प्रसिध्द केला जात आहे. विजेत्या ग्राहकाने ओळखपत्र दाखवून आपली भेटवस्तू घेवून जायची आहे.

कालचे भाग्यवान ग्राहक
काल दि.02 फेब्रुवारी रोजीचे भाग्यवान ग्राहक –
1) कार्तिक पराग भोसले
2) सौ. लता काला
3) रामदास उघडे (दत्तनगर, श्रीरामपूर)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...