श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दि. 30 जानेवारीपासून सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2025 ची काल ग्राहकांच्या उदंड प्रतिसादाने सांगता झाली. दरम्यान यानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणीच्या’ कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या श्रीरामपूर येथील सौ. पुनम सुरज पवार तर पढेगाव येथील सौ. किर्ती ओंकार देशपांडे व श्रीरामपूर येथील सौ. भाग्यश्री रोहीत कोठारी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला.
दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष होते. या महोत्सवासाठी सहप्रायोजक म्हणून साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी, राहुरी फॅक्टरी व वासन टोयोटा अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले.
काल दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, वृत्तसंपादक अशोकराव गाडेकर, व्यवस्थापक महेश गीते, जाहीरात व्यवस्थापक विनोद नेवासकर आदींच्या हस्ते शॉपिंग एक्स्पोचे सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, सार्वमत शॉपिंग एक्स्पो मध्ये सहभाग घेतल्याबद्दल वासन टोयोटाचे मार्केटींग मॅनेजर समीर पवार, अथर्व मोटर्सचे संचालक अमोल बोंबले, सद्गुरू ट्रॅक्टर्सचे सर्जेराव मुंढे, रामभाऊ टेकाळे, तनुश्री अॅटोचे संचालक तुषार पानसरे, टीव्हीएस भन्साळीचे श्री. कापसे, श्रीजय एटंरप्रायजेसचे रामेश्वर दौंड यांचा तसेच एक्स्पोसाठी सर्व स्टॉलधारकांना एकत्र आणून मदत केल्याबद्दल धवल मेहता, व संपूर्ण स्टॉलची उभारणी करुन अतिशय उत्तम सेवा देणार्या कुर्हे टेंडचे संचालक विजय कुर्हे यांचा सत्कार करण्यात आला.
या खरेदी महोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या पाच दिवसांमध्ये ग्राहकांना खरेदी बरोबरच मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळाली. तसेच खवय्यांसाठीही विविध चमचमीत खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. काल शेवटच्या दिवशी मनोरंजानाच्या कार्यक्रमात खास महिलांसाठी आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यातील प्रथम तीन विजेत्या महिलांना या एक्स्पोचे सहप्रायोजक तथा साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्था, राहुरी फॅक्टरीच्या चेअरमन सौ. संगिताताई कपाळे यांच्या हस्ते पैठणी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
भाग्यवान ग्राहक सोडत
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 ला भेट देणार्या ग्राहकांना कुपन देण्यात आले त्यातून दररोज लकी ड्रॉ पध्दतीने तीन भाग्यवान ग्राहक निवडले गेले.
काल दि.03 फेब्रुवारी रोजीचे भाग्यवान ग्राहक –
1) आयुष श्रीकांत कचेरीया, मोरगे वस्ती, श्रीरामपूर
2) चंद्रकांत अंबादास लासुरकर, देवळाली प्रवरा
3) आदिती दिपक भोसले, सेंट लूक हॉस्पीटलजवळ
या बक्षीस विजेत्यांनी ओळखपत्र दाखवून आपली भेटवस्तू दैनिक सार्वमत कार्यालयातून घेवून जावी.