Thursday, March 13, 2025
Homeनगरसार्वमत ‘शॉपिंग एक्स्पो’चा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार शुभारंभ

सार्वमत ‘शॉपिंग एक्स्पो’चा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार शुभारंभ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दै. सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2025 चा शुभारंभ काल किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, सराफ व्यावसायिक सोमनाथ महाले, श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कृष्णा कलेक्शनचे संचालक पुरुषोत्तम झंवर, राजपालचे अरुण कतारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, मर्चंट असो. चे संचालक निलेश बोरावके, आप चे तिलक डुंगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून व हवेत फुगे सोडून करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, व्यवस्थापक महेश गिते, जाहिरात व्यवस्थापक विनोद नेवासकर, वृत्तसंपादक अशोक गाडेकर, वृत्तसंपादक बद्रीनारायण वढणे व मार्केटिंग अधिकारी गोविंद केंगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

- Advertisement -

याप्रसंगी किशोर निर्मळ यांनी दै. सार्वमत आयोजित शॉपिंग महोत्सव व्यावसायिकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. तसेच ग्राहकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. या उपक्रमासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे सांगून त्यांनी दै. सार्वमतच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कृष्णा कलेक्शनचे पुरुषोत्तम झंवर यांनी दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग महोत्सव एक अनोखा उपक्रम आहे. श्रीरामपूरच्या बाजारपेठेसाठी हा महोत्सव अतिशय महत्वाचा आहे. कारण बर्‍याच वेळा स्थानिक उत्पादीत वस्तुंची ग्राहकांना माहिती नसते. त्यामुळे यामध्ये सर्व सहभागी व्यावसायिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे संजय छल्लारे यांनी हा उपक्रम असाच चालू रहावा म्हणून सार्वमत परिवाराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक सार्वमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले. दै. सार्वमत सलग पाचव्यांदा श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर भव्य शॉपिंग एक्स्पोचे आयोजन करत असून यावर्षी या महोत्सवासाठी सहप्रायोजक म्हणून वासन टोयोटा व साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी यांचे सहकार्य लाभले आहे. काल शुभारंभ झालेला हा खरेदी महोत्सव दि. 3 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, विविध औषधे तसेच टु व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्या वस्तुंपासून मोठ्या वस्तुंपर्यंतचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी सुरू झाली आहे.

टोयोटो कंपनीची फोर व्हिलर इच्छुक ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना खरेदी बरोबरच विविध खाद्य पदार्थांचा आस्वादही याठिकाणी घेता येणार आहे. याबरोबरच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही याठिकाणी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होणार आहेत. आज दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 1 ली ते 7 वी पर्यंतच्या मुला-मुलींचे सोलो डान्स, दि. 1 फेब्रुवारी रोजी खास महिलांसाठी अँकर प्रवीण प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ तर दि. 2 फेब्रुवारी रोजी खुल्या गटातील मुला-मुलींचे सोलो डान्स होणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी दि. 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या खरेदी महोत्सवानिमित्त दि. 31 जानेवारी व दि. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित सोलो डान्ससाठी स्थानिक हौसी कलाकारांनी सार्वमत कार्यालयात आजच नावनोंदणी करावी. दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रथम नोंदणी करणार्‍या मर्यादित कलाकारांना संधी दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी येणार्‍यास संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आपली नावनोंदणी आजच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काल शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी थत्ते मैदानावर गर्दी केली होती. आज या शॉपिंग महोत्सवाचा दुसरा दिवस असून सोमवार दि. 3 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ग्राहकांना याठिकाणी खरेदी बरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. तरी या संधीचा श्रीरामपूर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी दोन ई-बाईकची विक्री
दै.सार्वमत आयोजित शॉपिंग महोत्सव 2025 या महोत्सवाच्या शुभारंभाच्या दिवशी दोन ग्राहकांनी तुनवाल ई मोटर्सच्या दोन ई-बाईकची खरेदी केली. लोणी येथील दत्तात्रय विखे, राहुल विखे व अरुण तांबे यांंनी वाढदिवसानिमित्त तसेच दत्तनगर येथील नम्रता विघे व अनंत विघे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ई-बाईकची खरेदी केली. त्यांना कृष्णा कलेक्शनचे संचालक पुरुषोत्तम झंवर, किशोर निर्मळ, संजय छल्लारे यांच्याहस्ते बाईकची चावी देण्यात आली. याप्रसंगी तुनवाल ई मोटर्स चे डिलर रामेश्वर दौंड उपस्थित होते.

भाग्यवान ग्राहक सोडत
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 ला भेट देणार्‍या ग्राहकांना कुपन देण्यात येत असून त्यातून दररोज लकी ड्रॉ पध्दतीने तीन भाग्यवान ग्राहक निवडले जात आहेत. या ग्राहकांना दुसर्‍या दिवशी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे. भाग्यवान ग्राहक सोडतीचा निकाल दै. सार्वमतच्या अंकामध्ये प्रसिध्द केला जाणार असून विजेत्या ग्राहकांनी ओळखपत्र दाखवून आपली भेटवस्तू घेऊन जायची आहे.

काल दि.30 जानेवारी रोजीचे भाग्यवान ग्राहक –
1) विकास वाघमारे (थत्ते ग्राउंड जवळ श्रीरामपूर),
2) आशा ज्ञानदेव चौधरी (श्री दत्त म्हाडा सोसायटी)
3) शहनाज पी. शेख (वॉर्ड-7, श्रीरामपूर)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...