Sunday, May 3, 2026
Homeनगरसुवर्ण प्रवासाची दमदार सुरुवात : 'सहकार मंथन' परिषद व विशेषांक प्रकाशन सोहळ्याने...

सुवर्ण प्रवासाची दमदार सुरुवात : ‘सहकार मंथन’ परिषद व विशेषांक प्रकाशन सोहळ्याने ‘दैनिक सार्वमत’च्या सुवर्ण महोत्सवाला भव्य प्रारंभ

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे दैनिक सार्वमत यंदा आपल्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत प्रवेश करत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे लोकशक्तीची भूमिका निभावणार्‍या या दैनिकाने आता नव्या पर्वात पदार्पण केले असून, या महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

- Advertisement -

या उपक्रमांचा भव्य प्रारंभ आज 31 जुलै रोजी सहकार मंथन परिषद व विशेषांक प्रकाशन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रमभाऊ सारडा यांच्याद्वारे झाला. कोपरगाव येथील कृष्णाई बँकेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत सहकारी नेते, संपादक मंडळ व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, सहकार मंथन या परिषदेत सहकार क्षेत्रातील सध्याचे आव्हान, नव्या संधी आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्रातील अनुभव, संघर्ष आणि पुढील दिशा यावर आपले विचार मांडले.

याच कार्यक्रमात दैनिक सार्वमतच्या विशेष सुवर्ण महोत्सवी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात सहकार क्षेत्राचा इतिहास, त्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची ओळख, वाचकप्रिय विशेष लेख आणि संपादकीय दृष्टिकोन यांचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवाचे हे वर्ष केवळ स्मरणरंजनापुरते न राहता, विचारमंथन आणि सामाजिक योगदान या दृष्टीनेही समृद्ध ठरेल, असा विश्वास कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

जिल्ह्यातील वाचक, सहकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात सार्वमतने उभा केलेला विश्वासाचा सेतू आता अधिक मजबूत होण्याची नांदी या सोहळ्याने दिली आहे.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...