Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, नातेवाईकांचा खळबळजनक आरोप, रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव?

डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, नातेवाईकांचा खळबळजनक आरोप, रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव?

सातारा | Satara
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर आता खळबळजनक खुलासे समोर येऊ लागले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी लिहिलेले आणखी एक पत्र समोर आले आहे. या प्रकरणात महिलेच्या काकांनी आणि आतेभावाने गंभीर आरोप केले आहे. काकांच्या आरोपानुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना वारंवार सांगितले होते की, “तणावामुळे माझे आयुष्य संपवावे लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे. तर आतेभावाने महिलेला फोन करणारे फलटण भागातील खासदार होते, असा आरोप केलाय.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणाने साताऱ्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आयुष्य संपवले. मृत डॉक्टरांनी केलेल्या एका कथित अर्जात एका खासदाराच्या पीएचा उल्लेख आहे. हा पीए फोनवरून बोलताना अनेकदा खासदार बोलत असल्याचे सांगायचा. तसेच रिपोर्ट बदलण्याबाबत दबाव टाकत असे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण राजकीय दबावाखाली असल्याचे आरोप कुटुंबाकडून केला जात आहे.

- Advertisement -

पत्रात नेमके काय म्हंटले आहे?
डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोलिसांचा, वैद्यकीय क्षेत्रातील काहींचा दबाव होता. वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांकडून काही संशयित आरोपींना आणण्यात येत असे. त्यावेळी डॉ. मुंडे यांच्यावर पोलिसांकडून संशयित आरोपी फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात येत असे. मात्र, डॉ. संपदा मुंडे यांनी या प्रकाराला नकार देत वस्तुस्थितीनिहाय अहवाल देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. मुंडे यांचा छळ सुरू झाला.

महिला डॉक्टरच्या नातेवाईकाने आरोप केला आहे की, फक्त खासदार इतकाच उल्लेख आहे. नाव कोणाचेही नाही खासदारांच्या पीएने खासदारांना फोन लावून दिला आणि त्यानंतर मॅडम त्यांच्याशी बोलल्या होत्या. हे खासदार फलटण भागातील आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. याबाबत बहिणीशी चर्चा झालेली नाही. महिलेची दुसरी चुलत बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला काही दिवसांपूर्वी महिलेने दबाव येत असल्याबाबत सांगितले होते. त्यानंतर आत्महत्या केल्यानंतरच आम्हाला समजले. बहिणीने दोन-तीन महिन्याआधी तक्रार देऊन देखील त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केलाय.

चौकशी समितीला सविस्तर सांगूनही दाखल घेतली नाही. पोलीस निरीक्षक अनिल महाडीक यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. त्याशिवाय, एकदा खासदारांनी फोन केला असल्याचे पत्रात म्हटले आहे. खासदारांच्या पीएने वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी थेट खासदारांना फोन लावून दिला होता. त्यांनी देखील तुम्ही बीडचे असल्याने प्रमाणपत्र देत नाहीत, अशी पोलिसांची तक्रार असल्याचे म्हटले. त्यानंतर डॉ. संपदा मुंडे यांनी असे पुन्हा होणार नसल्याचे सांगितले.

जूनमध्ये केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने 13 ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा माहिती अधिकार टाकून डीवायएसपी कार्यालयाकडून ऑफिसकडून माहिती मागवली. मात्र, तपासात कोणतेही सहकार्य होत नसल्याने आणि शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याने डॉ. संपदा मुंडे यांनी अखेर टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Delhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

0
नवी दिल्ली | New Delhi सध्या देशभरात उष्णतेने (Heat) कहर केला आहे. दिवसांदिवस तापमान वाढत असल्याने या उकाड्यापासुन बचाव करण्यासाठी अनेक घरांमध्ये पंखा किंवा एसी...