Thursday, March 13, 2025
HomeराजकीयSatej Patil : कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील म्हणाले, “आता इथून...

Satej Patil : कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील म्हणाले, “आता इथून पुढं…”

कोल्हापूर । Kolhapur

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उत्तर कोल्हापुरात मात्र, अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या मधुरीमा राजे यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सर्वांनाच आश्चर्चायाचा धक्का बसला होता.

- Advertisement -

यावरून सतेज पाटील चांगलेच संतापल्याचंही बघायला मिळालं होतं. सोमवारी सांयकाळी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता सतेज पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील म्हणाले, सोमवारी जे काही घडलं त्यावर आता बोलण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. आता इथून पुढं कसं जावं, याची चर्चा मी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांशी करणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकताच पार पडली आहे. पुढची दिशा आम्ही संध्याकाळपर्यंत निश्चित करू.

तसेच, या मुद्द्यावरून मला कोणताही वाद करायचा नाही. जे झालं ते खूप आहे. इथून पुढे जाणं आता महत्त्वाचे आहे. ज्या काही गोष्टी धडल्या आहेत, त्या सर्वांच्या समोर आहेत. त्यावर आता मी बोलणं संयुक्तिक नाही. महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन आम्ही आज संध्याकाळपर्यंत आमची भूमिका स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराजांशीसुद्धा मी चर्चा केली आहे. त्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. मला छत्रपती शाहू महाराजांबाबत आदरच आहे. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या आजच्या कोल्हापूर दौरऱ्यासंदर्भात बोलताना, मी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठीच एअरपोर्टला निघालेलो आहे. तिथून अंबाबाईचं दर्शन करणार आहोत आणि मग सभेच्या ठिकाणी जाणार आहोत,” असं सतेज पाटलांनी सांगितलं. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जिथं जिथं शक्य आहे तिथे उमेदवार माघार घेण्यासाठी आम्हाला यश आलं आहे, असंही सतेज पाटलांनी सांगितलं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...