Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC पेपरफुटी वादानंतर सचिव बदलले; IAS सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

MPSC पेपरफुटी वादानंतर सचिव बदलले; IAS सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर राज्य सरकारने आयोगाच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि २०१६ च्या तुकडीतील IAS अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विद्यमान सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पुण्यात विद्यार्थ्यांनी सलग ११ दिवस केलेल्या आंदोलनानंतर सरकारने अनेक मागण्यांवर सहमती दर्शवली असून, या घडामोडींना आंदोलनाचे महत्त्वाचे यश मानले जात आहे.

तर विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने अध्यपदाचा अतिरिक्त कार्यभार इतर सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, पेपरफुटीच्या प्रकरणानंतर MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन उभे केले होते. तब्बल १२ दिवसांच्या आंदोलनानंतर काही दिवसांपूर्वीच महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरून उचल बांगडी करण्यात आली होती. यानंतर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवारांचीदेखील यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

- Advertisement -

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असतानाच सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी आता सौरभ कटियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी (12 ऑक्टोबर) मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये भेट झाल्यानंतर सरकारचा मसुदा त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी, भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. “आपण संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला,” असे जाहीर करत ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता त्यांची जागा ही रिक्त असून याबाबत राज्य सरकार कोणाची निवड करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik Crime News : उच्च न्यायालयाकडून ‘बॉस’ला जामीन मंजूर; मात्र कारागृहातील मुक्काम कायम, नेमकं कारण काय?

कोण आहे सौरभ कटियार?
सौरभ कटियार हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून कानपूरमधील मिरगाव येथील मुळ गावात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून त्यानी बीटेक आणि नंतर एमटेक केलं. युपीएससीमध्ये 334 व्या रँक मिळवली अन् 2014 मध्ये त्यांची आयआरएसमध्ये निवड झाली. त्यानंतर त्यांना नागपूरच्या आयकर विभागात प्रशिक्षण घेतलं होतं. सौरभ यांनी कोणतीही कोचिंग न घेता युपीएससीची परीक्षा क्रॅक केली होती.

प्रशासकीय कारभारातील अनुभव
अमरावती जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मुंबई उपनगर जिल्ह्यात नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, यासाठी त्यांनी ‘मॉडर्न सेतू’ उपक्रम सुरू केल्याचे वृत्त आहे. यात डिजिटल सुविधा आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.

आता MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर आयोगाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे, परीक्षा व भरती प्रक्रियेतील वेळापत्रक आणि उमेदवारांशी संबंधित कामकाज हाताळणे अशी महत्त्वाची जबाबदारी असेल. हा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांची कायमस्वरूपी सचिवपदी नियुक्ती झाली आहे, असा अर्थ घेता कामा नये.

ताज्या बातम्या

राहुल

‘कोणीही न्यायव्यवस्थेला दबावाखाली आणू शकत नाही’; राहुल गांधींना नोटीस, सुप्रीम कोर्टाची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि INDIA आघाडीतील इतर नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस...