Thursday, March 13, 2025
Homeनाशिकविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नाशिक। प्रतिनिधी Nashik

तालुक्यातील माैजे जाखाेरी येथे श्वानाची शिकार करताना सहा वर्षीय नर बिबट्या कठडे नसलेल्या विहिरीत पडल्याची घटना (दि. २५) घडली मौजे जाखोरी येथील संतोष वामन जगळे यांच्या शेतजमिनीतील विहीरीत बुधवारी बिबट पडल्याची माहिती नाशिक वनपरिक्षेत्रासह जलद वन्यजीव बचाव पथकाला मिळाली.

- Advertisement -

माहिती कळताच पश्चिम वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीमने घाव घेत बिबट्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन रेस्क्यू ऑपरेशन फत्ते केले. त्यामुळे जाखाेरीसह आर्मी एरिया व दारणा नदी काठी बिबट्यांचा अधिवास जास्त प्रमाणात असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान, रेस्क्यू केलेल्या बिबट्यावर म्हसरुळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा हाेत आहे.

या वेळी पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक) प्रशांत खैरनार यांचे सूचनेनुसार नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वात जलद वन्यजीव बचाव पथकातील वनपाल अनिल अहिरराव, कुशाल पावरा, वनरक्षक विजय पाटील, दीपक जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र ठाकरे, गोविंद काळे, सचिन आहेर, संतोष चव्हाण, मोहन लकडे, वाहन चालक अशोक खानझोडे, शरद अस्वले, विजय साळुंखे, विशाल शेळके यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. तसेच टीमसाेबत अभिजीत महाले, हर्षद नागरे व सदस्य आणि जाखोरी ग्रामस्थांचे सहकार्य केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...