Thursday, April 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSayaji Shinde: झाडं तोडणं हे साधु संताना पटेल का? तपोवनातील वृक्षतोडीवरुन अभिनेते...

Sayaji Shinde: झाडं तोडणं हे साधु संताना पटेल का? तपोवनातील वृक्षतोडीवरुन अभिनेते सयाजी शिंदेंचा थेट सवाल

मुंबई | Mumbai
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तपोवनासाठी वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. निवडून दिले म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले असतानाच आता पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी झाडे तोडलेले पटेल का? असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे.

अभिनेते आणि पर्यावरणप्रमी सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, “मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” असा सवाल सयाजी शिंदेंनी केला.

- Advertisement -

पण झाडाबद्दल राजकारण करु नका
राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. सगळं आनंदाने व्हावं, अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली.

पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं
10 वर्षांच्या आतली झाडं तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावायचीही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे, पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं, मूळात त्याचं उरलेलं वय किती आहे. त्यामुळे, झाडं तोडून दुसरीकडे कुठतरी 10 झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं हे आपली आई-बाप आहेत. आपण जगतो ते केवळ झाडांमुळे जगतो. आपल्या आई-बापांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहोत का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले.

झाडं तोडणं हे साधु संतांना पटेल का?
कुठल्याही साधु संतांचा आपण कसा अपमान करू, मुळात झाडं तोडणं हे साधु संताना पटेल का? असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहा वर्षे झालेली झाडं मोडायची आणि त्या बदल्यात दुसरी 10 झाडं लावणं ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं महत्वाची आहेत आणि ती जगली पाहिजे हेही महत्वाचं आहे.

मनसे चित्रपटसेना करणार आंदोलन
तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करणार आहे. विशेष म्हणजे हा निषेध नोंदविण्या साठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबर ला सकाळी हा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Sangamner : विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंतांवर हल्ला

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण...