Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे...

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे निर्देश

२ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील सर्व माध्यमांच्या १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी दिले.

भुसे यांनी आज सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा विस्तार करण्याबाबत बैठक घेतली. राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना सध्या स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

स्काऊट-गाईड उपक्रमासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना सध्या तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सर्व माध्यमांच्या १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश #शालेयशिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा विस्तार करण्याबाबत बैठक घेतली. राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना सध्या #स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड असणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायत बंधनकारक करावी. तसेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका यासाठी घेण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

स्काऊट-गाईड उपक्रमासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना सध्या तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (ऑनलाईन), एससीईआरटी चे संचालक मंगेश जोशी (ऑनलाईन), उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

@dadajibhuse— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 14, 2026

ताज्या बातम्या

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; सार्वजनिक रस्ते आणि गल्लीबोळात वर्षभर फटाके फोडण्यावर...

0
​मुंबई | प्रतिनिधी नवरात्रोत्सव, आगामी दिवाळी आणि ख्रिसमससह सर्वच सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यावर आता वर्षातील सर्व ३६५ दिवस बंदी लागू...