Tuesday, September 29, 2026
Homeनगरलोहोगावमध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

लोहोगावमध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय सोनईच्या अंतिम वर्षाच्या कृषिकन्या ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रम आणि वनस्पती रोगशास्त्र विषयांतर्गत नेवासा तालुक्यातील लोहोगाव येथे बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या उपस्थित करून दाखवले.

यावेळी शेतकऱ्यांना बीज बीजप्रक्रियेचे महत्व आणि बीजप्रक्रियेची गरज सांगण्यात आली आहे. बीजप्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांपासून बियांचे संरक्षण केले जाते आणि बियाणाची मर कमी होण्यास मदत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करण्याचे आणि विद्यापीठाची वार्षिक कृषिदर्शनी वापरण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषीकन्या भवर पुनम, वैष्णवी कदम, नम्रता चोपडे, स्नेहल खेडकर, वैष्णवी फरताडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल दरंदले, डॉ. संतोष चौगुले, प्रा. श्रीकृष्ण हरुळे , डॉ. निर्मला विधाते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...