Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यादीड काेटींचा मद्यसाठा जप्त

दीड काेटींचा मद्यसाठा जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र गुजरात बॉर्डरजवळील सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा -परगाणा रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने कारवाई करीत दीड कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

- Advertisement -

पुणे येथील पथकाने नाशिक जिल्ह्यात येऊन कारवाई केल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे भरारी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बर्डीपाडा परगाणा रोडजवळील परिसरात छापा टाकून दादरा नगर हवेली येथे तयार केलेली व तेथेच विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा जप्त केला.

त्यात विदेशी मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यानुसार पथकाने मद्यसाठा व दोन आयशर टेम्पो, दोन चारचाकी अशी एकूण चार वाहनांसह एकूण १ कोटी ५८ लाख २२ हजार ५०४ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

या कारवाईत गिरीष भिका पवार (२३), हेमंत झांबरु मोरे (२२दोघे रा. सुरगाणा तालुका), शैलेश महादू गावित (३०, रा. वलसाड, रा. गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. आधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या